“Mumbai Police Commissioner or Lifetime Member of CP Compound?”

मुंबई पोलीस आयुक्तपद की CP Compound ची आजीवन मेंबरशिप?

श्री देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

देवेन भारती यांची ही पुनर्नियुक्ती निश्चितच राजकीय वर्तुळातील त्यांची मजबूत पकड दर्शवते; किंबहुना, मुंबई पोलीस दलातील त्यांचा प्रदीर्घ प्रभाव आणि दबदबा अधोरेखित करते.

देवेन भारती हे बहुधा एकमेव असे IPS अधिकारी असावेत, ज्यांनी एकदा CP Compound मध्ये प्रवेश केल्यानंतर तिथेच कायमस्वरूपी बस्तान बसवले आहे. महाराष्ट्रात सरकार कोणाचेही असो, CP Compound मधील त्यांची उपस्थिती मात्र कायम राहिली आहे.

त्यांच्या कारकिर्दीतील पदांचा क्रम पाहिला, तर हे अधिकच स्पष्ट होते:

  • पोलीस उपायुक्त, मुंबई
  • पोलीस उपायुक्त (Detection), मुंबई
  • सह पोलीस आयुक्त (Crime), मुंबई
  • सह पोलीस आयुक्त (Law & Order), मुंबई
  • सह पोलीस आयुक्त (EOW), मुंबई
  • विशेष पोलीस आयुक्त, मुंबई (प्रथमच निर्माण करण्यात आलेले विशेष पद)
  • पोलीस आयुक्त, मुंबई
  • आणि आता पदोन्नती वर पुन्हा एकदा पोलीस आयुक्त, मुंबई!

दरम्यान, अशीही चर्चा ऐकायला मिळते की, निवृत्तीनंतर त्यांच्यासाठी ‘निवृत्त पोलीस आयुक्त, मुंबई शहर’ असे एखादे नवीन पद निर्माण करून त्यांची आजीवन त्या पदावर नियुक्ती केली जाऊ शकते!

एवढेच नव्हे, तर त्यानंतरही ते वेळोवेळी CP Compound मध्ये फेरफटका मारताना आणि दर मंगळवारी जनता दरबार घेताना दिसू शकतात, अशीही उपरोधिक चर्चा आहे.

अर्थात, हे सर्व केवळ उपरोधिक भाष्य आणि चर्चेच्या स्वरूपात असले, तरी एक प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो:   देवेन भारती यांचा CP Compound शी असलेला हा अतूट संबंध नेमका कधी संपणार?

शेवटी, असेच म्हणावे लागेल की, देवेन भारती हे CP Compound सोडतील, अशी शक्यता तरी सध्या दिसत नाही!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *