मा. देवेन भारती चुकीच्या तपास अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करतील का? की ते केवळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या “X” खात्यावर मस्करी करत आहेत?

click for ENGLISH:

मा. श्री देवेन त्रिपुरारी सरन भारती, पोलीस आयुक्त, मुंबई

मा. आयुक्त महोदय,

मी तुमच्या “X” (पूर्वीचे Twitter) अकाऊंटवर पाहिले की दर मंगळवारी दुपारी ३ वाजता तुम्ही पूर्व-नियुक्तीशिवाय तक्रार घेऊन येणाऱ्यांना भेटता. काही कारणांमुळे मला मंगळवारी प्रत्यक्ष येणे शक्य नाही. त्यामुळे, माझी ही तक्रार प्रत्यक्ष भेटून केलेली तक्रार मानून, पुढील योग्य कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती पारदर्शकतेसाठी सार्वजनिक करावी, ही नम्र विनंती.

तक्रारीचे मुद्दे:

१. मुंबई सीरियल रेल्वे आणि मालेगाव बॉम्ब स्फोट

मा. न्यायालयाने मुंबई सीरियल रेल्वे (१२ आरोपी) आणि मालेगाव बॉम्ब स्फोट (७ आरोपी) प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करताना तपास यंत्रणेच्या त्रुटींचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. या गंभीर त्रुटींसाठी, तपास यंत्रणेतील अधिकारी
(अ) ए.एन. रॉय,
(
ब) के.पी. रघु वंशी,
(
क) सुबोध कुमार शिवशंकर जयस्वाल (चौधरी),
(
ड) परमवीरसिंग होशियारसिंग आणि इतर –
यांच्यावर काही कारवाई करणार आहात की नाही?

२. आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि संग्राम सिंग निशानदार

साधारण एक आठवड्यापूर्वी, मा. उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई (EOW) चे अधिकारी श्री संग्राम सिंग निशानदार यांच्या तपासातील त्रुटींवर गंभीर ताशेरे ओढले होते. या संदर्भात, संग्राम सिंग निशानदार यांच्यावर त्यांच्या तपासातील त्रुटींसाठी काही कारवाई केली जाईल की नाही?

प्रार्थना:

उत्तर अपेक्षित आहे.

(विशेष सूचना: मा. देवेन भरती साहेब,जर तुम्हाला सत्याचा सामना करायचा असेल, तर कृपया माझा मोबाईल नंबर अनब्लॉक करा).

One comment

  1. Mr. X. तुम्ही न्यायाधीश बनू नका जे काही कोर्टाच्या आदेश येतील त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त कारवाई करतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *